आवृत्ती पुणे

पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यात ६ पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माजी महापौर आणि आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँकेचे संस्थापक शांतीलाल सुरतवाला (वय ७६) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. तसेच ते सुरेश कलमाडी … Read more

केअर टेकरने वृद्ध मेजरला १ कोटी ११ लाख रुपयांचा घातला गंडा

धनादेश चोरून बँकेतून काढले पैसे : लष्कर पोलिसांनी एकाला केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुलबाळ कोणी नसलेल्या व सध्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध मेजरच्या केअर टेकरने इतरांच्या मदतीने धनादेश चोरून तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण लक्षात येताच लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबत … Read more

गावठी दारू विक्रेत्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पाषाण येथील लमाण तांडा व परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला … Read more

ज्वेलर्सला भररस्त्यात अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

सुखसागरनगरमधील रात्रीची घटना : तिघा चोरट्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुकान बंद करून घरी जात असलेल्या ज्वेलर्सला दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी लोखंडी हत्याराने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भरतसिंह मानसिंग जोधा राठोड (वय ४३, रा. अजिंक्य अपार्टमेंट, सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. बिनमार, जि. जालोर, राजस्थान) असे गंभीर … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने परिचारिकेची ५३ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांच्या जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीय अधिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका परिचारिकेची ५३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परिचारिकेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ५१ वर्षीय परिचारिका घोरपडी येथील बी. टी. कवडे … Read more

एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणारा नराधम अटकेत

दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस : खेड व बारामतीमध्ये केले खून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपल्याबरोबर कामाला असलेल्या महिलेवर एकतर्फी प्रेमातून विकृत माणसाने तिचा खून केला. त्याचबरोबर आणखी एकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या विकृत माणसाने आतापर्यंत चार जणांचे खून केल्याचे समोर आले आहे. जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे, ता. खेड) असे … Read more

अजित पवार यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राहणार उपस्थित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विमान अपघातात निधन पावलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमान … Read more

४४ वर्षांच्या झंझावात अकाली निमला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन पुणे : साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राजकारणात आलेले आणि आपले काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. महाराष्ट्र एका कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. देशातील … Read more

बीजेएसच्या ‘जैन पारिवारिक अदालत’चे उद्घाटन

कौटुंबिक-वैवाहिक प्रश्न समाजाच्या पातळीवरच सामोपचाराने सोडविणारा दिशादर्शक उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वर्तमान काळात लग्नानंतर निर्माण होणारे कौटुंबिक वाद, कलह आणि घटस्फोटांची संख्या देशभरात झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस ही समस्या अधिकच गंभीर होत असून सामाजिक व्यवस्थेसाठी हा विषय चिंतेचा ठरत आहे. या अनुषंगाने समाजातील समस्या समाजाच्या पातळीवरच संवाद व सामोपचाराने सोडविण्याचा ‘जैन पारिवारिक अदालत’ … Read more