आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणारा नराधम अटकेत

पुणे : आपल्याबरोबर कामाला असलेल्या महिलेवर एकतर्फी प्रेमातून विकृत माणसाने तिचा खून केला. त्याचबरोबर आणखी एकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या विकृत माणसाने आतापर्यंत चार जणांचे खून केल्याचे समोर आले आहे.

जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे, ता. खेड) असे या विकृत माणसाचे नाव आहे. त्याने रंजना अरुण वाघमारे (वय ३५, रा. खांडपे, ता. कर्जत, जि. रायगड) आणि सुरज अंकुश वाघ (वय ३०, रा. वांगणी, ता. बदलापूर, जि. ठाणे) या दोघांचा खून केला होता.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी याबाबत माहिती दिली. सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळखैरेवाडी (ता. बारामती) येथील खैरेपडळ परिसरात एका महिलेचा मृतदेह १९ जानेवारी रोजी सकाळी आढळून आला होता. तिच्या डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या होत्या.

हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सुपा पोलीस ठाण्यातील पथक तपास करत होते. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एका संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. घटनास्थळावर एक डायरी मिळाली होती.

या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे लालासाहेब मारुती जाधव (रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांच्याकडे चौकशी करण्यात आली. ते चिंचाची झाडे खरेदी करून चिंचा झोडण्याचे काम करतात. त्यांना फुटेज दाखविले असता त्यांनी संशयित जैतू बोरकर असल्याचे सांगितले. त्यानंतर जैतू बोरकर याला खेड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत असे निष्पन्न झाले की, जैतू बोरकर याच्यासोबत कोयंडे परिसरात मजुरीसाठी रंजना वाघमारे व सुरज वाघ हे काम करत होते. जैतू बोरकर याचे रंजना वाघमारे हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तो तिला त्याच्यासोबत राहण्याची जबरदस्ती करत होता.

महिलेने विरोध दर्शविल्यामुळे जैतू बोरकर याने रागाच्या भरात १७ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी कोयंडे गावातील चोऱ्याचा डोंगर परिसरात सुरज वाघ याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर तो रंजना वाघमारे हिला घेऊन सुपा परिसरात निघून गेला.

१८ जानेवारी रोजी सुपा येथील काळखैरेवाडी परिसरात रात्रीच्या वेळी रंजना वाघमारे हिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. ती पोलिसांकडे तक्रार करेल, या भीतीने जैतू बोरकर याने तिच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

खेड पोलीस ठाण्यात सुरज वाघ याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैतू बोरकर याला अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, जिनेश कोळी, शंकर भवारी, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, स्वप्निल अहीवळे, अभिजित एकशिंगे, संदीप लोंढे, विशाल गजरे, महादेव साळुंखे, किसन ताडगे, रुपेश साळुंखे, राहुल भाग्यवंत, निहाल वणवे, तुषार जैनक, सोमनाथ होले, अश्विनी चांदगुडे, दीपाली मोहिते, संतोष घोलप, अमोल चासकर, स्वप्निल लोहार, सागर शिंगाडे, सदाशिव मल्ले, संदीप लांडे, बाळकृष्ण साबळे, संतोष शिंदे, सोमनाथ गव्हाणे यांनी केली आहे.

get_footer();