आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

adminuser • Political • April 22, 2026

पुणे : पिकअपचे टायर बदलत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

याबाबत कुणाल राहुल चौगुले (वय १८, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी मांजरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कुणाल राहुल चौगुले (वय १८) आणि सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८, दोघे रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराविरुद्ध पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोलापूर–पुणे रोडवरील द्राक्ष संशोधन केंद्र येथील पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाच्या फलकाजवळ २० एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश कांबळे हे महिंद्रा पिकअपचे टायर बदलण्याचे काम करत होते. रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तिघे जण तेथे आले. कोणतेही कारण नसताना त्यांनी कुणाल चौगुले यांच्यावर कोयत्याने डोक्यात, खांद्यावर व पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

स्थानिक नागरिकांनी जखमी कुणाल चौगुले यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी चौगुले यांच्याकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत दोघांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करत आहेत.

get_footer();