आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध घटना रोखण्यासाठी विशेष मोहिम

adminuser • Political • April 10, 2026

पुणे : शहर पोलीस दलातील परिमंडळ १ मधील सार्वजनिक ठिकाणी घडणारे गुन्हे, अवैध अंमली पदार्थ सेवन करणारे तसेच सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणाऱ्या घटना रोखण्यासाठी गुरुवारी रात्री विशेष मोहिम आयोजित करण्यात आली होती.

फरासखाना, विश्रामबाग, समर्थ, खडक, डेक्कन, शिवाजीनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुरुवारी रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान ही विशेष मोहिम राबविण्यात आली. या परिसरातील ४१ सार्वजनिक ठिकाणे, ब्लॅकस्पॉट्स आणि मोकळी मैदाने यांची तपासणी करण्यात आली.

त्यात सार्वजनिक रस्ते अडविणाऱ्यांवर (कलम २८५) दोघांवर खटले, गुटखा विक्री करणाऱ्यांवर ५ खटले, ट्रिपल सीट जाणाऱ्या १० जणांवर गुन्हे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या एकावर कारवाई, नो-एंट्रीमधून येणाऱ्या तिघांवर कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या २२ जणांवर खटले भरण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले व परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

get_footer();