आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रांताधिकारी गोविंद शिंदे याला २ लाखांची लाच घेताना अटक

adminuser • Political • March 27, 2026

पुणे : जुन्नर, आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाख रुपयांची लाच घेताना सापळा रचून रंगेहात पकडले. मंचर येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जुन्नर, आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) म्हणून गोविंद शिंदे कार्यरत आहेत. एका इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी तक्रारदाराने त्यांच्या कार्यालयात अर्ज केला होता.

त्यासाठी शिंदे यांनी २ लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी मंचर येथील गोविंद शिंदे यांच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेताना त्यांना पकडण्यात आले. मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

get_footer();