आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

adminuser • Political • March 9, 2026

भूम : विद्या विकास मंडळ पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे महिला कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “आधुनिक महिला पुढील आव्हाने” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. ज्योती मांडोत (डुंगरवाल) यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या व्याख्यानात त्यांनी आजच्या आधुनिक महिलांना शिक्षण, करिअर, कुटुंब व समाज या सर्व क्षेत्रांत संतुलन राखताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. महिलांनी आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबनाच्या बळावर ही आव्हाने समर्थपणे पेलावीत, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल अलगुंडे यांनी केले, तर प्रा. दीप्ती गिरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

get_footer();