आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

adminuser • Political • March 3, 2026

पुणे : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा मेळावा स्नेह, आठवणी आणि संवादाने भरलेला अविस्मरणीय सोहळा ठरला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अल्केम लॅबोरेटरी लिमिटेडचे उपाध्यक्ष (मार्केटिंग व सेल्स) समीर श्रीवास्तव उपस्थित होते. तसेच प्रशासकीय मंडळाचे सदस्य डॉ. रमेश जुनेजा (एम.डी. व सीईओ, बी. जे. डब्ल्यू. हेल्थकेअर प्रा. लि.), माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल सेनगावकर आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे आयुक्त गिरीश दापकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत एकमेकांशी संवाद साधला. नेटवर्किंग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. मनोरंजनात्मक कार्यक्रमांत खेळ, संगीत, सांस्कृतिक सादरीकरणे व मुक्त संवाद सत्राचा समावेश होता.

या मेळाव्यास तीनशेहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी हे संस्थेचे खरे बळ असून त्यांच्या अनुभवाचा सध्याच्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होऊ शकतो. त्यांनी करिअर मार्गदर्शन, इंटर्नशिप व रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या २५ वर्षांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे नियोजन सचिव डॉ. शुभांगी दसवडकर, खजिनदार डॉ. सारिका निकम, डॉ. सोनाली महापराळे, प्रा. मुकेश मोहिते व प्रा. अश्विनी गावीत यांनी केले.

सूत्रसंचालन वैभवी कुलकर्णी व श्रेयसी देशमुख यांनी केले. संस्थेचे संचालक रियर अ‍ॅडमिरल अमित विक्रम (नि.) यांनी हा मेळावा माजी विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ करणारा ठरल्याचे नमूद केले.

get_footer();