आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डोकेवाडी गावात लोकसहभागातून उभारला भव्य खुला सभामंडप

adminuser • Political • February 27, 2026

भूम : भूम तालुक्यातील डोकेवाडी गावात सुशिक्षित तरुणांच्या संघटित प्रयत्नातून आणि गावकऱ्यांच्या लोकसहभागातून भव्य खुल्या सभामंडपाची उभारणी करण्यात आली असून, हे सभामंडप धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी गावकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे.

गावातील तरुण मंडळी एकत्र आली तर कोणतेही मोठे कार्य शक्य होते, याचे उत्तम उदाहरण भूम तालुक्यातील डोकेवाडी गावात पाहायला मिळाले आहे. मागील दोन वर्षांपासून गावातील १५ सुशिक्षित युवकांनी एकत्र येऊन स्वतंत्र सप्ताह समिती स्थापन केली. या तरुणांनी भक्तीमार्ग स्वीकारत गावातील अखंड हरिनाम सप्ताहाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

गेल्या ५५ वर्षांपासून गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असला तरी कोणतीही नवी घडामोड घडत नव्हती. त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेत गावकऱ्यांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने लोकसहभाग जमा केला.

नोकरदार, व्यापारी, शेतकरी व शेतमजूर अशा सर्व स्तरातील नागरिकांच्या सहकार्याने दोन वर्षांत अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. या लोकसहभागातूनच गावात भव्य खुले सभामंडप उभारण्यात आले आहे.

हे सभामंडप धार्मिक कार्यक्रम, विवाह समारंभ तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी सर्वसामान्य कुटुंबांना उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या सभामंडपामुळे अनेक कुटुंबांचा मंडप उभारणीचा खर्च वाचणार असून आर्थिक दिलासा मिळणार आहे.

get_footer();