आवृत्ती पुणे
← Back to Homepage

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

adminuser • Political • February 19, 2026

भुम : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भूम नगर परिषद कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता ताई गाढवे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमास मुख्याधिकारी प्रवीण जाधव, नगर परिषदेचे गटनेते सुरज गाढवे, नगरसेवक अभिजीत शेटे, नगर अभियंता गणेश जगदाळे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

get_footer();