आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गांजाची तस्करी करणारे दोघे जेरबंद

adminuser • Political • February 18, 2026

पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने संशयास्पदरीत्या कारसह थांबलेल्या दोघांना ताब्यात घेत ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत एकूण १४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. नवीन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर) आणि विशाल दत्तात्रय जाधव (वय २८, रा. हिंगणे मळा, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कदमवाक वस्ती परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी कृपासिंधु ईस्ट सोसायटीसमोर कारसह संशयास्पदरीत्या थांबलेले दोघे आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. कारची झडती घेतली असता ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा आढळून आला. दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, वैभव मगदुम तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

दरम्यान, आरोपी अक्षय पाडुळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गेल्या वर्षी साकीनाका पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात तो मागील एक वर्षापासून फरार होता. फरारी असताना तो पुण्यात अंमली पदार्थांची तस्करी करून गांजाची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

get_footer();