आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारूची वाहतूक

maha360news • Political • April 14, 2026

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अवैध व्यवसायावर कारवाई करत असताना स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी पकडले. त्याच्या गाडीतून २ लाखांच्या विदेशी दारूसह २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा माल जप्त केला आहे.

अंग्रेजसिंग पुरणसिंग गिल (वय ३८, रा. रामनगर, बोपखेल) असे या तस्कराचे नाव आहे. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक शहादल बाबा चौक येथे १४ एप्रिल रोजी पहाटे बंदोबस्त करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार भीमराव कांबळे व अमोल वायाळ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नगर रोडच्या दिशेने विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करत आहे.

ही माहिती मिळताच पोलीस पथकाने शहादल बाबा चौकातील केंद्रीय महाविद्यालयाजवळ सापळा रचला. तेथे आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीला थांबवले. चालक अंग्रेजसिंग गिल याला गाडीची डिकी उघडण्यास सांगितले.

आतमध्ये विविध ब्रँडची २ लाख रुपयांची विदेशी दारू आढळून आली. स्कॉर्पिओ, मोबाईल व विदेशी दारू असा एकूण २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत, रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार भीमराव कांबळे, अमोल वायाळ, दत्तात्रय शिंदे, सूरज ओंबासे, अमोल गायकवाड, कादिर शेख, राहुल परदेशी, अतुल जाधव, उगले यांनी केली.

get_footer();