आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त फिजिओथेरपीची दमदार सुरुवात – पहिल्याच बॅचचा १००% निकाल

adminuser • Political • March 28, 2026

पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (बीपीटी) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंतिम वर्षाच्या तुकडीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. संस्थेच्या इतिहासातील हा अभिमानास्पद टप्पा असून, पहिल्याच बॅचने उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची परंपरा निर्माण केली आहे.

या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विशेष प्रावीण्य मिळवले. यामध्ये याहवी बरई हिने ७५.२५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. महेश्वरी रणसुभे हिने ७४.८७ टक्के गुणांसह द्वितीय, तर मीनल परटे हिने ७३.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्यासह प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले.

बॅचलर ऑफ फिजिओथेरपी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पुराव्यावर आधारित ज्ञानासोबतच कार्डिओपल्मनरी रिहॅबिलिटेशन, मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी, न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन आणि पेडियाट्रिक फिजिओथेरपी अशा विविध क्षेत्रांतील क्लिनिकल कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जातो.

विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कौशल्यांची जोड देत, भावनिक समर्पण आणि सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत भविष्यातील सक्षम, कुशल आणि संवेदनशील आरोग्यसेवा व्यावसायिक घडविण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे, असे डॉ. सिमी रेठरेकर यांनी नमूद केले.

प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, क्लिनिकल प्रशिक्षण तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी ०२०-६७९०१३७६ किंवा ९७६५५५१३२१ यावर संपर्क करावा. तसेच, संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊनही संपर्क साधता येईल.

get_footer();