आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

adminuser • Political • April 6, 2026

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ४५ वर्षीय नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात फिर्यादीशी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले.

चोरट्यांनी त्यांना सोशल मीडियावरील एका समूहात सहभागी करून घेतले. फिर्यादींनी पैसे गुंतवल्यानंतर चोरट्यांनी त्यांना आभासी खात्यात परतावा मिळाल्याचे भासविले. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर पैसे काढता आले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

get_footer();