आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बुधवार पेठेतील दोन बांगलादेशी महिलांवर कारवाई

maha360news • Political • April 11, 2026

पुणे : पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बुधवार पेठेत विशेष शोध मोहीम राबविली. त्यात दोन बांगलादेशी महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर दोघींकडे आधार कार्ड असल्याचे आढळले.

बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी महिला देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी या परिसरात वारंवार छापे टाकून आतापर्यंत अनेक बांगलादेशी महिला व काही पुरुषांना पकडले आहे.

त्यापैकी काही जणांना बांगलादेशात पाठविण्यात आले आहे. हद्दपारीसंदर्भातील नवीन सरकारी आदेश व मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता जलद हद्दपारी शक्य झाली आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत या दोन बांगलादेशी महिला आढळून आल्या. त्यांच्या जवळ आधार कार्ड आढळले असून, त्यांना ही कार्डे कुठून मिळाली याचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले.

या मोहिमेत ४२ सार्वजनिक ठिकाणे, ब्लॅक स्पॉट्स आणि मोकळी मैदाने तपासण्यात आली. त्यात भा.न्या.सं. कलम २८५ प्रमाणे ३ गुन्हे, कोटपा अंतर्गत १२ खटले, ट्रिपल सीटवर ३१ कारवाया, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत २२ खटले, एनडीपीएस कायद्यान्वये २ गुन्हे आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ४ गुन्हे दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले तसेच परिमंडळ १ मधील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.

सलग दुसऱ्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी तपासणी
पोलीस दलाच्या परिमंडळ १ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी तपासणी मोहीम राबविण्यात आली. फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मोकळ्या जागा, ब्लॅक स्पॉट्स व सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध प्रकार तसेच सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

get_footer();