आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शी आगार येथे बस स्थानक वेळापत्रकाचे अनावरण सोहळा संपन्न

adminuser • Political • February 18, 2026

बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या पुढाकाराने आणि संस्थेकडे आलेल्या मागणीनुसार बार्शी आगार बस स्थानकाच्या नव्या वेळापत्रकाचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम आगार प्रमुख श्रीमती मधुरा संदिपान जाधवर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी वाहतूक निरीक्षक गणेश चव्हाण, जयसिंग परदेशी, वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वाघुलकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे सचिव अजय तिवारी, सुनील फल्ले, नामदेव गरंडे, सुरेंद्र स्वामी, रेखा विधाते, रागिनी झेंडे, सुजाता अंधारे, रेखा सरवदे आणि कुमारी आर्या कदम हे सन्माननीय सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वीही संस्थेच्या माध्यमातून बार्शी आगार येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे कार्य समाजासाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचे उद्गार आगार प्रमुख मधुरा जाधवर यांनी काढले.

हे वेळापत्रक तयार करण्यासाठी वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वाघुलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी आभार मानले.

get_footer();