आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

adminuser • Political • February 18, 2026

बार्शी : बार्शी शहरातील तेलगिरणी परिसरातील महावीर अर्बन को-ऑप बँकेसमोर, बाजारपेठेतील गर्दीच्या व रहदारीच्या ठिकाणावरून हिरो होंडा सीडी डिलक्स (क्र. MH 13 BF 4705) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12.27 ते 1.00 वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी किशोरकुमार काशीनाथ बाभळे (रा. ढगे मळा, राऊत प्लॉट, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित दुचाकी लाल-काळ्या रंगाची असून चोरट्याने हँडल लॉक तोडून ती लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

गर्दीच्या ठिकाणीही वाहन चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अमोल माने हे करत आहेत. नागरिकांनी वाहन पार्क करताना अतिरिक्त सुरक्षा उपायांचा अवलंब करावा व संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

get_footer();