आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यात एप्रिल महिन्यातील १३० वर्षांनंतर विक्रमी पाऊस

adminuser • Political • April 3, 2026

पुणे : पुणे शहरात गुरुवारी दुपारी झालेला तुफानी अवकाळी पाऊस ऐतिहासिक ठरला आहे. पुणे हवामान विभागाच्या गेल्या १५० वर्षांच्या नोंदीनुसार गुरुवारी झालेला पाऊस हा एप्रिल महिन्यातील विक्रमी पाऊस ठरला आहे. या विक्रमी पावसामुळे संपूर्ण शहर तळ्यासारखे झाल्याचे दिसून आले. पुणे महापालिकेच्या पायाभूत सुविधांची पोलखोल या पावसाने केली आहे.

पुण्यात यापूर्वी ४ एप्रिल १८९६ रोजी एका दिवसात ५१.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. हा आजवरचा एप्रिल महिन्यातील एका दिवसात पडलेला विक्रमी पाऊस होता. गेल्या दशकाचा विचार करता, १३ एप्रिल २०२३ रोजी एकाच दिवशी २४.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.

त्यावेळी पाषाण येथे सर्वाधिक ४५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यापूर्वी २००५ मध्ये ३६.७ मिमी आणि २०११ मध्ये २५.६ मिमी पाऊस झाला होता. तर १९७८ मध्ये एप्रिल महिन्यात २७.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.

गुरुवारी शहरात झालेल्या पावसाने सर्वत्र एकच हाहाकार उडवला. महत्त्वाचे सर्व रस्ते ओढ्याचे स्वरूप धारण करताना दिसले. अनेक वाहने त्यामध्ये अडकली. कार पाण्यात बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

get_footer();