आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

adminuser • Political • February 23, 2026

बार्शी : जागतिक रोटरी दिनानिमित्त रोटरी क्लब बार्शी यांच्या वतीने “शांतता सायकल रॅली”चे उत्साहात आयोजन करण्यात आले. समाजात शांतता, बंधुता व सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

रॅलीची सुरुवात श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून करण्यात आली. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार विजयकुमार शितोळे व प्राचार्य शेख सर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ बार्शीचे अध्यक्ष रोटेरियन संजय हिंगमिरे, सचिव मधुकर डोईफोडे, क्लब प्रशासन प्रमुख आनंद बेदमुथा, ज्येष्ठ रोटेरियन प्रदीप बागमार, जवाहरभाई माढेकर, गोविंद बाफना, विशाल रगडे, नवनाथ गुल्हाने, शैलेश वखारिया, अतुल कल्याणी, गणेश स्वामी, श्रीकांत चिपडे, नितीन बकाल, गौरव कमठाने, सोमनाथ गुल्हाने अमित खटोड, स्मिता शामराज मॅडम तसेच विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या रॅलीमध्ये सुमारे १२५ शालेय विद्यार्थी व २० रोटेरियन सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत शिवसृष्टी येथे समारोप केला.
संपूर्ण रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी व रोटेरियन सदस्यांनी शांतता, एकता आणि सामाजिक सौहार्द यांचे संदेश फलकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवले. नागरिकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व पदाधिकारी, सदस्य, शाळांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

get_footer();