आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरगुती गॅसच्या काळ्या बाजाराचा भंडाफोड

maha360news • Political • April 15, 2026

दुकानातून १०३ गॅस सिलेंडर आणि टेम्पो असा १० लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हांडेवाडी परिसरात एक जण घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत आहे.

ही माहिती पडताळून पाहिली असता, काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानाच्या बाजूला एक टेम्पो उभा असल्याचे दिसले. त्यामध्ये घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर ठेवलेले आढळले. पोलीस काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानात गेले असता, तेथे एक जण धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरत असल्याचे दिसून आले.

नितीन होळकर असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दुकान व टेम्पोमधील १०३ गॅस सिलेंडर आणि टेम्पो असा एकूण १० लाख ९ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांनी केली.

get_footer();