आवृत्ती पुणे

बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोला पडला खड्डा

शिवाजी रोडवरील घटना : जुनी बोअरवेल जिवंत करताना गेले ६० फूट खोल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शुक्रवार पेठेतील शिवाजी रोडवरील भूमिगत मेट्रोच्या वर घरमालकाने वाडा पाडून तेथील जुनी बोअरवेल जिवंत करताना ६० फूटांपेक्षा अधिक खोल खोदकाम केल्याने मेट्रोच्या बोगद्याला ६ इंचाचा खड्डा पडला. बोगद्याच्या सिमेंटच्या रिंगमधून पाणी गळू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी … Read more

‘पीटीपी’ अ‍ॅपवर तक्रार करा, बेकायदा होर्डिंग्सवर गुन्हे

पोलीस आयुक्त अमितेश कुमार : सर्वाधिक नियमभंगाच्या केसेस करणाऱ्यांचा गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरिकांनी ‘पीटीपी’ अ‍ॅपचा वापर करून शहरातील अनाधिकृत होर्डिंग्सबाबत माहिती पोलिसांना द्यावी. बेकायदा होर्डिंग्सवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचप्रमाणे रस्त्यावरील बेवारस, बिनधनी वाहने तसेच रस्त्यावर विनाकारण पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने हटवून रस्ते नागरिकांसाठी मोकळे करण्याची मोहीम हाती घेण्यात … Read more

मानलेल्या बहिणीची छेड काढल्यावरून तरुणाला मारहाण करून केले जखमी

बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक : तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आईबरोबर घरी पायी जात असताना टोळक्याने तरुणाला अडवून “माझ्या मानलेल्या बहिणीला का छेडतो?” असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने डोक्यात, पाठीवर, छातीवर व पोटात मारहाण करून गंभीर जखमी केले. बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात … Read more

विजेच्या धक्क्याने कारागीराचा मृत्यू

बाणेरमधील घटनेत दोघा बांधकाम ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचवेळी पुणे शहरातील काही भागात १८ मार्च रोजी अवकाळी पाऊस पडला होता. या पावसामुळे सुतारकाम करणाऱ्या एका कारागीराला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने बाणेर पोलिसांनी दोघा ठेकेदारांविरुद्ध … Read more

पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या ६ जणांना येवलेवाडी पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाला दांडक्याने मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवली. येवलेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून या टोळक्यातील ६ जणांना अटक केली आहे. अविनाश मारुती दीक्षित (वय २०, रा. … Read more

‘सूर्यदत्त’मध्ये आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर

कर्करोग प्रतिबंधासाठी जागरूकतेवर भर : ३०० हून अधिक रुग्णांचा सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त संस्थेत आयोजित आरोग्य शिबिरात कर्करोगासह विविध आजारांच्या तपासण्या करण्यात येत नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स आणि राहुरी येथील डॉ. माने मेडिकल फाउंडेशन व साईधाम हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त … Read more

पारगावात रक्तदानाचा १९ वर्षांचा यज्ञ, ४० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शहिद दिनानिमित्त आयोजित शिबिरात युवक व महिलांचा मोठा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : पारगाव येथे सलग १९ वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदान उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. राष्ट्रसंत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त तसेच भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांच्या शहिद दिनानिमित्त वाशी तालुक्यातील पारगाव येथे … Read more

डिजिटल माध्यमांवरील बंदीविरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेचे वार्तांकन डिजिटल माध्यमांना करण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात आज तीव्र निषेध नोंदवण्यात आला.श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह बाहेर ज्येष्ठ पत्रकार शरद लोणकर यांनी ठिय्या आंदोलन करत निर्णयाचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला पुणे मराठी पत्रकार संघच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. संघाचे अध्यक्ष धनराज गरड यांनी महापौर मंजुषा … Read more

दुचाकी जाळणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक

पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पेट्रोल टाकून दुचाकी जाळली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्नानंतर काही महिन्यांत झालेल्या वादातून माहेरी निघून गेलेल्या पत्नीने नांदण्यास येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. राजकुमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा १२ दिवसांनंतरही मोकाट

सातार्‍यातील कोरेगाव येथील घटनेतील दोघेही पुण्यात पेट्रोल पंपावर दिसले महाराष्ट्र न्युज नेटवर्क सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेणारा गुन्हेगार १२ दिवस उलटूनही पकडण्यात कोरेगाव पोलिसांना यश आलेले नाही. कोरेगाव पोलीस त्याचा शोध घेत असून, ते दोघे पुण्यातील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण … Read more