आवृत्ती पुणे

विना परवाना मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीनंतर परवानगी नसताना जनता वसाहत परिसरात मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरज नथुराम लोखंडे (वय ४५, रा. दत्त मंदिर, जनता वसाहत, पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार काटकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र काम करू

नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचे आवाहन : भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भूमवासीयांनी आम्हाला सभागृहात पाठवले आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांनी केले. भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात त्या … Read more

अंधांप्रती कृतीशीलता हे आपले सामाजिक कर्तव्य : डॉ. शां. ब. मुजुमदार

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नेत्रसेवेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतानाही अंधांची संख्या आजही नियंत्रित झालेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. दृष्टीशी संबंधित अनेक समस्या उपचाराने पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. मात्र, योग्य माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे अनेकांना आयुष्यभर दृष्टी गमवावी लागते. त्यामुळे दृष्टीहिनतेच्या समस्येला सामोरे जाणे हे समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे, … Read more

पराभवानंतर चुलत भावाच्या घरात शिरून हात-पाय तोडण्याची दिली धमकी

भवानी पेठेतील घटना : काशेवाडी–डायस प्लॉट प्रभागात झाला होता पराभव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीत यांच्यामुळे कमी मते पडली व पराभव झाला, असे समजून भाजप उमेदवाराच्या नातेवाईकांनी चुलत भावाच्या घरात शिरून कुटुंबाला शिवीगाळ करत हात-पाय तोडण्याची धमकी दिली. याबाबत गणेश शिवाजी लडकत (वय ५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

शिरुरच्या ग्राम महसूल अधिकारी लाच घेताना जाळ्यात

शेतीचा पंचनामा करण्यासाठी मागितली होती लाच : एसीबीने सापळा रचून केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोन भावांमधील वाटणीवरून शेतीचा पंचनामा करण्यासाठी तसेच पुढील सहकार्य करण्याच्या बदल्यात १० हजार रुपयांची लाच मागून ७ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्राम महसूल अधिकाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ पकडले. प्रमिला नागेशा वानखेडे (वय ४२, रा. तक्षशिला सोसायटी, … Read more

गँगस्टर गजा मारणेच्या टोळीतील गुंडाने बळकावली जमीन

महिलेला जीवे ठार मारण्याची दिली धमकी : वडगाव बुद्रुक येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गँगस्टर गजा मारणेच्या टोळीतील एका गुंडाने महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिची जमीन बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी या गुंडावर गुन्हा दाखल केला आहे. वाघु तुकाराम हळंदे (रा. वारजे) व त्याचे साथीदार अशी गुन्हा दाखल … Read more

प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण

प्रभाग क्रमांक ९ मधील बाबुराव चांदेरे यांना दिला होता पाठिंबा : बाणेरमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना बाणेर परिसरात मतदान सुरू असताना घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, … Read more

बिगुल वाजला : भूममध्ये सत्तेचा ‘महासंग्राम’ सुरू!

५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी : १२४ मतदान केंद्रांवर १.०२ लाख मतदारांचा सहभाग भूम : भूम तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी आणि पंचायत समितीच्या दहा गणांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

निवडणूक आयोगाकडून पत्रकारांची गैरसोय

मतमोजणीपासून दूर ठेवण्यासाठी ‘लाल तंबू’चा प्रयोग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांवर थेट अन्याय करणारा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 20, 21 आणि 26 च्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाकडून पत्रकारांसाठी करण्यात आलेली व्यवस्था अत्यंत अपुरी व गैरसोयीची असल्याची तीव्र प्रतिक्रिया पत्रकार वर्गातून व्यक्त … Read more

औषध वितरकाला साडेतीन कोटींचा गंडा

दोघा भामट्यांवर चौथा गुन्हा दाखल : आतापर्यंत १८ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सदाशिव पेठेतील एका औषध वितरकाची तब्बल ३ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघा भामट्यांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, आतापर्यंत त्यांनी १८ कोटी रुपयांहून … Read more