आवृत्ती पुणे

पूर्ववैमनस्यातून पानटपरी चालकाचा दगडाने मारून खून

येवलेवाडी कमान येथील घटना : पोलिसांनी १२ तासांत आरोपींना केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून पानटपरी चालक तरुणाच्या डोक्यात टोळक्याने दगड घालून त्याचा निर्घुण खून करण्यात आला. याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी १२ तासांत तिघा गुन्हेगारांना अटक केली आहे. आदित्य सुभाष गायकवाड (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा), गणेश किशोर मारे (वय २०, रा. कात्रज–कोंढवा), कौशल्य … Read more

दोन वर्षांच्या मुलीचा खून करून आईची गळफास घेऊन आत्महत्या

मुलीच्या आजाराला कंटाळून केले कृत्य, वारजेमधील गोकुळनगरमधील धक्कादायक घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ते दोघेही एकमेकांचे नातेवाईक होते आणि त्यांनी परस्पर संमतीने लग्न केले होते. त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र, तिच्यामध्ये जन्मतःच जेनेटिक समस्या निर्माण झाली होती. तिला अस्थीविकार होता. मुलगी दोन वर्षांची झाली तरी तिची प्रकृती नाजूकच होती. या मानसिक तणावातून आईने … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल चा रेट्रो थीमवरील सांस्कृतिक सोहळा उत्साहात

प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने टिळक स्मारक मंदिरात रंगला कार्यक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, पुणे यांचा प्री-प्रायमरी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे रेट्रो थीमवर मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्लोक पठण, संगीत तसेच जुन्या काळातील गाण्यांवर आधारित रंगतदार नृत्य सादर करून उपस्थितांची … Read more

आरोग्य उपसंचालकांसाठी ३ लाख रुपयांची लाच घेताना आरोग्य सेवक जाळ्यात

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची पुणे जिल्हा परिषदेत कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नियुक्तीसाठी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना ३ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून ३ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवकाला रंगेहाथ पकडले. रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४४, रा. सरकारी निवासस्थान, आरोग्य केंद्र, वाघोली) असे … Read more

रेझिंग डे निमित्त बार्शी शहर पोलीस स्टेशनतर्फे जनजागृती कार्यक्रम

साधना कन्या प्रशालेतील ८० विद्यार्थिनींची पोलीस स्टेशन भेट महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सेवा, शौर्य, समर्पण व विश्वास या ब्रीदवाक्याअंतर्गत महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध … Read more

पूर्ववैमनस्यातून पानटपरी चालकाचा दगडाने मारून खून

येवलेवाडी कमान येथील घटना, सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सहा महिन्यांपूर्वी दुसरीकडे राहण्यास गेलेल्या पानटपरी चालकाच्या डोक्यात टोळक्याने दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. एकनाथपुरम सोसायटी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. येवलेवाडी पोलिसांनी या प्रकरणी सात जणांवर खुनाचा … Read more

डिजिटल मीडियातील तरुण चेहरा संघटनेच्या नेतृत्वात

ओंकार हिंगमिरे यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सोलापूर जिल्हा सचिवपदी निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : डिजिटल पत्रकारितेत अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ‘बार्शी लाईव्ह’चे कार्यकारी संपादक ओंकार हिंगमिरे यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या सोलापूर जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. … Read more

होम व्हिजिटला बोलावून डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून लुबाडले

सातारा रोडवरील रात्रीची घटना, डॉक्टरांना लुबाडण्याची शहरातील पहिलीच घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडील आजारी असल्याचे सांगून तपासणीसाठी होम व्हिजिटला बोलावून दोघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांना मारहाण करून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे-सातारा रोडवरील अथर्व फरिहाज बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली. याबाबत धनकवडी येथील … Read more

पिंपरीमध्ये २४० तर पुण्यात २०८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

नववर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालविणारे नाकाबंदीत पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नववर्षाचे स्वागत करताना मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत पिंपरीमध्ये २४० मद्यपी तर पुण्यात २०८ मद्यपी वाहनचालकांना पकडून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या … Read more

भुम नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा संयोगिता गाढवे यांनी स्वीकार पदभार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भुम शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांच्या हस्ते गाढवे यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यकाळासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.), वंचित … Read more