आवृत्ती पुणे

दोन भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

काशेवाडीतील घटना, फ्लेक्स लावण्यावरून झाला वाद, परस्परविरोधी तक्रारी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोघीही एकाच भाजपमधील, एकाच प्रभागातील उमेदवार. महापालिका निवडणुकीत त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र प्रचार केला होता. दोघीही निवडून आल्या. त्यानंतर आता गणेश जयंतीला फ्लेक्स लावण्यावरून या दोन्ही नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. खडक पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक … Read more

ट्रकच्या स्टिअरिंगपासून देशरक्षणापर्यंतचा प्रवास

बार्शीतील झालटे कुटुंबाची शहर, राज्य आणि राष्ट्र सुरक्षेतील अद्वितीय शौर्यगाथा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्यातील बार्शी शहरातील संभाजीनगर, राऊत चाळ येथे वास्तव्यास असलेले, मूळ पुरी (ता. बार्शी) येथील झालटे कुटुंब आज केवळ बार्शीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक ठरत आहे. मात्र हा गौरव एका रात्रीत मिळालेला नसून, त्यामागे आई-वडिलांचा संघर्ष, अपार कष्ट … Read more

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन प्रकल्प येण्यासाठी नियोजन करावे : ललित गांधी

दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क दावोस : दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत सहभागी होत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समान औद्योगिक विकासासाठी नवीन प्रकल्पांचे नियोजन करण्याची मागणी केली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, … Read more

प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवर विक्री करणाऱ्यांवर छापे

अंमली पदार्थ विरोधी पथकाची ६ ठिकाणी कारवाई : साडेआठ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रतिबंधित ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखुजन्य हुक्का फ्लेवरचा साठा करून विक्री करणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई केली असून ६ ठिकाणी छापे मारले. या कारवाईत ८ लाख ३२ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या … Read more

बार्शी दुहेरी हत्याकांड प्रकरणात महिला आरोपीस जामीन

ॲड. ओंकार बजाज यांच्या प्रभावी युक्तिवादावर समानतेच्या तत्वावर न्यायालयाचा दिलासा बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा क्र. ४१९/२०२४ प्रकरणात आरोपी सोनाली सौदागर पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १२६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत दाखल असलेल्या या गुन्ह्यात … Read more

राज्यस्तरीय हॉस्पिटॅलिटी स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमचा उपक्रम : महाराष्ट्रभरातील २७ महाविद्यालयांचा सहभाग महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रातील जागतिक आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन हॉस्पिटॅलिटी स्पर्धा–२०२६ सूर्यदत्त कॉलेज कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त

आंबेगाव पोलिसांची कारवाई; वालचंदनगरच्या गुंडावर नर्‍हेमध्ये कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वालचंदनगर परिसरात दहशत माजवून असलेला, स्थानबद्ध कारवाई झालेला व सध्या नर्‍हे येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सुयश सोमनाथ घोडके (वय २४, रा. सिद्धी हाईट्स, अभिनव कॉलेजजवळ, नर्‍हे) असे या सराईत गुन्हेगाराचे … Read more

रस्ता सुरक्षेचा धडा : विद्यार्थ्यांनी केले प्रत्यक्ष वाहतूक नियमन

बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात शिवाजी महाविद्यालयाचा सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीतील एकूण २४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर … Read more

मतमोजणी केद्रांत आंदोलन करणार्‍या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल

ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप करुन सुरक्षा जाळीवर चढून केली होती घोषणाबाजी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीतील मतमोजणीच्या वेळी बदललेल्या ईव्हीएम मशीन आणल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणी केंद्रात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान सुरक्षा जाळीवर चढून घोषणाबाजी केल्याप्रकरणी रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

नागरिकच होणार ‘वाहतूक पोलीस’ : पुणे ट्रॅफिक अ‍ॅपमुळे नियमभंगावर थेट कारवाई

फोटोसहित तक्रारीनंतर ई-चलानद्वारे कारवाई : तक्रारदारांची माहिती राहणार गोपनीय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ‘पुणे ट्रॅफिक (PTP) अ‍ॅप’ सुरू केले असून, या अ‍ॅपमुळे सामान्य नागरिकांनाही नियमभंगावर थेट कारवाईत सहभागी होता येणार आहे. शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी विकसित … Read more