आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महावीर जयंतीनिमित्त चिंचवड स्टेशन येथे रक्तदान शिबिर

पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त चिंचवड स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, चिंचवड स्टेशन आणि जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिरात एकूण ११७ पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. समाजोपयोगी या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे. रक्तदान शिबिरासोबतच नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये सुमारे १५० जणांची नेत्र तपासणी, तर १२० जणांची मोफत दंत तपासणी करण्यात आली.

या उपक्रमाचे आयोजन संघाचे अध्यक्ष अशोक लुंकड व सचिव सतीश मेहेर तसेच जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष मयूर पगारिया व सचिव नीलेश लुंकड यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

यावेळी राहुल लुंकड, हर्षल लुंकड, डॉ. अशोक बोरा, विलास बागमार, राजेंद्र धोका, सतीश खाबिया, संजय सी. जैन, सुहास लुंकड, संजय एस. जैन, श्रेणिक मंडलेचा, सचिन मुथा आणि हर्षल बाठिया आदी उपस्थित होते. तसेच जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया उपस्थित होते.

get_footer();