आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री वर्धमान जैन श्रावक संघाची नवी कार्यकारिणी जाहीर

पिंपरी-चिंचवड : भगवान महावीरांच्या जन्मकल्याणकाच्या मंगलमय पर्वावर थेरगाव परिसरात भक्तिभाव, एकता आणि नव्या संकल्पांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या पवित्र दिवसाचे औचित्य साधत श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या नव्या कार्यकारिणीची हर्षोल्हासात घोषणा करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धर्म, समाजसेवा आणि एकात्मतेचा वारसा जपत सात मजली भव्य स्थानक उभारण्याचा संघाचा महत्त्वाकांक्षी संकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. स्थानकाचा आराखडा मंजूर झाला असून बांधकामालाही वेगाने सुरुवात झाली आहे.

ही बाब थेरगावसाठी केवळ अभिमानाची नसून आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नव्या कार्यकारिणीवर जबाबदारी सोपवताना संघाने विकास, पारदर्शकता आणि समाजहिताचा दृढ निर्धार व्यक्त केला.

या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटना आणि नागरिकांकडून नव्या कार्यकारिणीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मंजुश्री महिला मंडळ, आनंद युवा मंडळ, जैनम् युवा ग्रुप आणि सरल कन्या मंडळ यांनीही अभिनंदन करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

थेरगावातील हा उपक्रम केवळ एका संघटनेपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाच्या एकजुटीचा, श्रद्धेचा आणि प्रगतीचा प्रेरणादायी प्रवास ठरत आहे. भगवान महावीरांच्या अहिंसा, सत्य आणि संयम या विचारांना अनुसरून हा नवा अध्याय समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अशी आहे नवी कार्यकारिणी
नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मोहनलाल संचेती, उपाध्यक्षपदी किशोर टाटिया, सह-उपाध्यक्षपदी मनोज भंडारी, मुख्य सचिवपदी पंकज सुराणा, सचिवपदी हर्षद खिंवसरा, कार्याध्यक्षपदी निलेश पितळे, सह-कार्याध्यक्षपदी गिरीश बाफना, खजिनदारपदी प्रदीप खाटेर, सह-खजिनदारपदी किरण संचेती यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नितीन चोरडिया, तुषार कांकरिया आणि प्रसाद बरडिया यांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

get_footer();